महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मुंबईच्या प्रवेशद्वारावरील झोपड्यांना बसण्याची शक्यता - निसर्ग चक्रीवादळ न्यूज

मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखुर्द या परिसरात पत्र्याची व कमकुवत घरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर या भागात सर्वाधिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

mankhurd area
मानखुर्द परिसर

By

Published : Jun 3, 2020, 3:05 PM IST

मुंबई -मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखुर्द या परिसरामध्ये निसर्ग चक्रीवादळाची चाहूल लागली असून या परिसरात काही वेळापासून पावसाला सुरुवात झाली आहे. वारेही वेगाने वाहत असून या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका या परिसराला बसण्याची शक्यता आहे.

परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी
याच परिसरात मंडाला नावाची एक मोठी झोपडपट्टी असून याठिकाणी अनेक कमकुवत आणि पत्र्याच्या शेडने बांधलेली घरे मोठ्या प्रमाणात आहेत. या घरांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे मानखुर्दच्या पूर्वेला महाराष्ट्र नगर नावाची झोपडपट्टी असून तेथेही मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या स्वरूपातील झोपड्या आहेत. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात पहिला फटका मुंबईच्या या प्रवेशद्वारावर असलेल्या झोपडपट्ट्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details