मुंबई -महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Appointment as Member of State Women Commission ) ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे, उत्कर्षा रुपवते या सहा जणींची यात समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत 25 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून ही नियुक्ती तीन वर्षे कालावधी करीता असेल, असे शासनाने म्हटले आहे.
हेही वाचा -Rupali Chakankar Special Interview with ETV Bharat : 'ती'चं अस्तित्त्व मान्य करणं म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण - रुपाली चाकणकर
मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्ष करावे का? यासाठी महाराष्ट्रात चर्चा व्हावी - सुप्रिया सुळे
मुलीच्या लग्नाचे वय अठरा वर्षावरून 21 वर्ष करण्यात ( girl marriage age 21 years ) यावे यासाठी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याअगोदर सर्व स्तरावर या बाबतची चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Union Minister Smriti Irani ) यांच्याकडे आपण केली असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule Reaction on girl marriage Age ) सांगितले. त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मंगळवारी त्या बोलत होत्या. तसेच महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे चर्चा झाली पाहिजे असं मतही त्यांनी या कार्यक्रमादरम्यान मांडले. मुलींचे लग्नाचे वय 21 वर्ष करावे. हा केंद्र सरकारचा निर्णय माझ्या वैयक्तिक पातळीवर मला चांगला वाटत असला. तरी, हा निर्णय संपूर्ण देशावर परिणाम करणार आहे. त्यामुळे या निर्णय घेण्या आधी सर्वांगीण चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.