मुंबई- आरे जंगलात गेल्या १५ दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. न्यूझीलंड हॉस्टेल, रॉयल पाम्स अशा ठिकाणी सहा ते आठ आगीच्या घटना घडत आहेत. शिकार आणि अनधिकृत बांधकामाच्या हेतूने या आगी लावल्या जात असून वन विभाग आणि इतर संबंधित विभाग याविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तर या प्रकरणी वनशक्ती संस्थेने पर्यावरण विभाग आणि वन विभागाकडे तक्रार दाखल करत असे प्रकार रोखण्याची मागणी केली आहे.
आरेत 'आगीचे सत्र सुरूच; मागील १५ दिवसांत सहा ते आठ आगीच्या घटना - mumbai-aarey forest latest news
आरे युनिट नंबर १ येथे ५०वर्षापासून फायर स्टेशन आहे. पण हे स्टेशन मागील १५ वर्षांपासून बंद आहे. या फायर स्टेशनमध्ये सद्या आधार कार्ड नोंदणीचे काम करण्यात येते. तेव्हा हे फायर स्टेशन पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आरेतील रहिवासी प्रकाश भोईर यांनी केली आहे.
बंद फायर स्टेशन सुरू करा
जंगलात नैसर्गिक आगीच्या घटना घडत असल्याने त्या ठिकाणी फायर स्टेशन असते. त्यानुसार आरे युनिट नंबर १ येथे ५०वर्षापासून फायर स्टेशन आहे. पण हे स्टेशन मागील १५ वर्षांपासून बंद आहे. या फायर स्टेशनमध्ये सद्या आधार कार्ड नोंदणीचे काम करण्यात येते. तेव्हा हे फायर स्टेशन पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आरेतील रहिवासी प्रकाश भोईर यांनी केली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आग वाढते आणि मोठे नुकसान होते. त्यामुळे हे फायर स्टेशन त्वरित सुरू करावे अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आरे पोलीस वा सुरक्षा रक्षक ठेवावेत आणि या घटना रोखाव्यात. तर आग लावणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे.