पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार मुंबई -पंतप्रधान मुंबईतील सहा विद्यार्थ्यांशी मेट्रो स्थानाकात संवाद साधणार आहे. मालाड येथील नगीनदास महाविद्यालयाचे विद्यार्थी पूर्वा बांधवडकर,पलक पंडित, आयुष गोयल, भव्य मामानिया, भव्या सोनी तर, जयहिंद महाविद्यालयाचा कौस्तुभ माने हे सहा विद्यार्थी मुंबईचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हितगुज करणार आहे. आज सायंकाळी जेव्हा पंतप्रधान गुंदवली या मेट्रो रेल्वे स्थानकामध्ये येतील त्यावेळेला प्राथमिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांची हितगुज करणार आहेत.
मुंबई मेट्रो मार्गाचे उद्घाटन - मुंबई मेट्रो मार्ग दोन, मार्ग सात यांचं एकाच वेळी उद्घाटन करीतल. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेसहा वाजता गुंदवली या मेट्रो रेल्वे स्थानकामध्ये उपस्थित राहतील. उद्घाटन केल्यानंतर ते महाराष्ट्रातील निवडक सहा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
विविध मुद्यावर विद्यार्थ्यांशी करणार चर्चा - विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना काय वाटतं, त्यांना या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या संदर्भात काय म्हणायचं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना हे सोयीचं वाटतं का? मेट्रो रेल्वे स्थानक त्यांना कुठला त्रास होतोय किंवा नाही; अशा अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सहा विद्यार्थ्यांसोबत हितगुज करणार आहेत.
पंतप्रधानांशी संवाद साधण्याचा आनंद - या सहा विद्यार्थ्यांपैकी जय हिंद महाविद्यालयाचा एक तर, बाकी नगीनदास महाविद्यालय मालाड येथील विद्यार्थीं आहेत. त्यांच्याशी ईटीव्ही भारत वतीने बातचीत केली असता, त्यांनी सांगितलं, की मेट्रो रेल्वे स्थानकांचे उद्घाटन होत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहेच. मात्र आम्हाला खास पाहुणे म्हणून पंतप्रधानांसोबत बोलायला मिळणार आहे. आमच्या सहा विद्यार्थ्यांची निवड त्यासाठी केली गेली आहे.
मेट्रोमुळे फायदा -या संदर्भातील एक प्रतिनिधी पलक पंडित नागीनदास कॉलेज मालाड येथील विद्यार्थिनी हिने म्हटलेल आहे की, मी गुजराती भाषिक आहे. मला या भेटीचा मला खूप आनंद झाला आहे. हायवेच्या आजूबाजूला राहणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थी मंडळींना मेट्रो रेल्वेमुळे फायदा होणार आहे. केव्हाही लोकल ट्रेन पकडायची तर, गर्दी भरपूर असते. रस्तावर ट्राफीक जामचा सामना करावा लागतो. मात्र, मेट्रोमुळे हायवे जवळ राहणारे नागरिकांना सहज दहिसर ते अंधेरी प्रवास करतात येणार आहे.
लोकल रेल्वे पर्यंत जाण्याची गरजच भासणार नाही - या सहाही विद्यार्थ्यांनी मेट्रो रेल्वे दोन, सात बाबत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले," आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जे पश्चिम द्रुतगती मार्गाच्या आजूबाजूला राहतात. त्यांना महाविद्यालयात जायचं असेल, कोचिंग क्लासला जायचं असेल, किंवा कुठे इतर कामासाठी जायचं असेल त्यावेळेला प्रत्येक वेळी मेट्रो रेल्वेने आता जाता येईल. बहुतेकदा लोकल रेल्वे पर्यंत जाण्याची गरजच भासणार नाही.
नागरिकांच्या प्रतिक्रिया - त या भागात राहणारे नागरिक मोहम्मद तसेच अमोल पाटील यांनी सांगितलं की, आम्ही या परिसरामध्ये राहतो. इथून दहिसरला कामानिमित्ताने ये जा करतो. तर कामाच्या उद्योगाच्या निमित्ताने हा प्रवास सोयीचा आहे. याचं कारण समजा 40 रुपये भाडं जर मेट्रो ट्रेनचं असलं, तर रिक्षाने लोकल रेल्वे स्टेशन पर्यंत जाणं तिथून पुन्हा तिकीट काढून दहिसरला जाणं महागात पडतं. असंच मध्य रेल्वेकडून कर्जत कसारा बदलापूरला जाणं हे खर्चिक आहे. त्यापेक्षा मेट्रोने दहिसरवरनं येथे अंधेरीला येता येईल. अंधेरीवरून दुसरी मेट्रो पकडून घाटकोपरला जाता येईल. घाटकोपर मार्गे सरळ हार्बर सेंट्रल रेल्वेने जाता येईल. त्यामुळे आमचा प्रवासाचा वेळ वाचेल, पैसे देखील वाचतील.
हेही वाचा -Modi Visit To Karnataka And Maharashtra : महाराष्ट्र कर्नाटकात मोदींचा झंझावात; दोन्ही राज्यांमध्ये कोट्यवधींच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन