मुंबई - येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार गल्लीत सहा मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचे नाव अहमद बिल्डिंग असे आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी ही घटना घडली. तर इमारत अतिशय जीर्ण असल्याने अगोदरच पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर इमारतीजवळ उभे वाहन इमारतीखाली दाबल्या गेल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सहा मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार गल्लीत सहा मजली इमारत पडल्याची घटना घडली आहे. या इमारतीचे नाव अहमद बिल्डींग असे आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी ही घटना घडली. तर इमारत अतिशय जीर्ण असल्याने अगोदरच पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये तीन मजली इमारत कोसळली
घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले आहेत. यामध्ये इमारतीचा ढिगारा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Last Updated : Sep 20, 2019, 12:36 PM IST