महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron - आफ्रिका व इतर देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोनाग्रस्त - Omicron Mumbai

युरोप तसेच साऊथ आफ्रिका येथे ओमीक्रोन ( Omicron Corona new Variant ) हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. याच दरम्यान राज्यात आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत.

corona
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 30, 2021, 10:21 PM IST

Updated : Nov 30, 2021, 10:47 PM IST

मुंबई- युरोप तसेच साऊथ आफ्रिका येथे ओमीक्रोन ( Omicron Corona new Variant ) हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. याच दरम्यान राज्यात आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एका प्रवाशाला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण -

ओमिक्रॉन व्हेरियंट आणि करण्यात येणारी कार्यवाही दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोविड 19 विषाणूच्या व्हेरियंटला ओमिक्राँन, असे नाव दिले असून हा व्हेरियंट ऑफ कंसर्न असल्याचे नमूद केले आहे. विषाणूमधील या जनुकीय बदलामुळे त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढल्याचे सध्या दिसत असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का किंवा हा नवा विषाणू प्रतिकार शक्ती भेदून संसर्ग करू शकेल का, याबाबत आताच निश्चित भाष्य करणे कठीण असले तरी येत्या दोन आठवड्यात या बदल अधिक माहिती मिळू शकेल. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

जिनोम सिक्वेनसिंग करण्याचे आदेश -

युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन आढळून आला आहे असे इतर 11 देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट ( RTPCR Test ) करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी आरटीपीसीआर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही 7 दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा टेस्ट करण्यात येईल आणि ते कोविड बाधित आढळल्यास त्यांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेनसिंग ( Genome Sequencing ) चाचण्या करण्यात येणार आहे. जे प्रवासी ओमिक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत त्यांच्यातील देखील 5 टक्के प्रवाशांची प्रयोगशाळा तपासणी करुन त्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याचे भारत सरकारने आदेशित केले आहे.

6 प्रवाशांना कोरोनाची लागण -

सध्या राज्यात आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. कल्याण-डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला असून या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोरोनाग्रस्त आढळले असून त्यांचेही नमुने एनआयव्ही पुणे ( NIV, Pune ) येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

निकट सहवासितांचा शोध -

या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार सातत्याने करावा, मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे तसेच ज्यांचे लसीकरण अद्याप अपुरे आहे अथवा ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी आपले लसीकरण त्वरेने पूर्ण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा -Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated : Nov 30, 2021, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details