मुंबई - शिवसेनेने मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, मुंबईत मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आहे.
गिरगावातील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस उशिरा शाळेत पोहोचत असल्याने दररोजचा होणारा त्रास. तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत या संदर्भात शिवसेनेने हे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती आहे. या आंदोलनात अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून एक ट्रक फोडण्यात आल्याचीही माहिती आहे.