मुंबई - अयोध्या रास जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लगले आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान राहिले आहे. या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुप येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे देशात 1992 सारखी परिस्थिती उद्भवणार नाही' - Supreme Court result ayodhya title suit
रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान राहिले आहे. या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुप येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत
हेही वाचा -'देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा; मात्र, मुख्यमंत्री शिवसेनेचाही होऊ शकतो'
राज्यातील सत्ता स्थापनेतील घडामोडीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मी रोज सकाळी तुमच्यासोबत बोलत आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जो संताप काल प्रकट केला. याला आमच्या शब्दात चाबकाचे फटके मारने असेच म्हणावे लागेल. शेवटचा हातोडा साहेबांनी काल मारला आहे. जनतेची ही भावनाच त्यांनी काल व्यक्त केली"