महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भीमा प्रकरणी सरकार एसआयटी स्थापन करणार; नवाब मलिक यांची माहिती

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी ही माहिती दिली.

bheema koregaon
कोरेगाव भीमा प्रकरणी सरकार एसआयटी स्थापन करणार; नवाब मलिक यांची माहिती

By

Published : Feb 17, 2020, 4:20 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला असला, तरी राज्य सरकारला या प्रकरणात समांतर चौकशी करता येते. त्यासाठीची तरतूद एनआयएच्या कलम १० मध्ये आहे. याच कलमाच्या आधारे राज्य सरकार चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी ही माहिती दिली. या बैठकीत प्रामुख्याने या वर्षातील आगामी जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या अनुषंगाने मंत्र्यांना काही सूचना देण्यात आल्या. महाविकासआघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवण्यासह निवडणुकीतील जाहिरनाम्यात असलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीवरही चर्चा झाली.

हेही वाचा -'...तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का?'

'आधारच्या माध्यमातून एनपीआरमध्ये माहिती गोळा केली आहे. एनपीआरमध्ये अतिरिक्त प्रश्वावली सरकारने टाकली आहे. यात आपल्या राज्यामार्फत कुठली प्रश्वावली टाकायची याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेतील. जनगणनेचा कार्यक्रम ठरला असून त्याबाबतची तयारी झाली आहे. मात्र प्रश्नावली अजून ठरलेली नाही' असे मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details