महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Trimbakeswar Shiva Temple Case : त्र्यंबकेश्र्वर शिव मंदिर प्रकरणाचा एसआयटी चौकशी अहवाल एक महिन्यात देणार - फडणवीस

त्र्यंबकेश्र्वर येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिव मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावरून मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण होऊन दोन समाजात वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात सभागृहात उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गठीत केलेल्या समितचा रिपोर्ट १ महिन्याच्या आत दिला जाईल असे आश्वासन दिले. (Trimbakeswar Shiva Temple Case )

Trimbakeshwar Shiv Mandir
त्र्यंबकेश्र्वर शिवमंदिर

By

Published : Jul 24, 2023, 6:19 PM IST

मुंबई :१३ मे रोजी संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी त्र्यंबकेश्र्वर शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संदल मिरवणूक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आली तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाद निर्माण होऊन धार्मिक तेढ निर्माण झाली. नाशिक येथील त्र्यंबकेश्र्वर शिवमंदिरात झालेल्या घटने प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

हे प्रकरण पूर्ण राज्यभर गाजले. यामुळे काही समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने तातडीने पावले उचलली. या प्रकरणात नक्की काय घडले. दोष कुणाचा याबाबत स्पष्टता नसल्या मुळे या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एक एसआयटी म्हणजे विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. याचा अहवाल कधी पर्यंत कधी पर्यंत दिला जाईल असा प्रश्न सभागृहात उपस्थित केरण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही श्रद्धा व परंपरा पाळण्यास शासनाचा विरोध नाही.

परंतु परंपरेच्या नावावर खोडसाळपणा होत असेल तसेच दोन्ही बाजूच्या भावना दुखावल्या जातील असतील तर ते सहन केले जाणार नाही. तसेच अशा पद्धतीने मंदिरात प्रवेश करणे ही परंपरा आहे की नाही हा वादाचा भाग आहे. २०२२ मध्ये याच मंदिरात अशा पद्धतीने मिरवणूक दरवाजाच्या आत गेली होती. त्याचे व्हिडिओ फुटेज सुद्धा आहेत. परंतु आता मंदिराच्या ट्रस्टीनीं तक्रार केली आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याबाबत एसआयटी सुद्धा नेमण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट १ महिन्यात सादर केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्र्वर शिव मंदिर भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिरात प्रवेश करत दुसऱ्या समाजातील काही लोकांनी चादर अर्पण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पुजारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असा मंदिर प्रशासनाचा दावा आहे. दुसरीकडे, शिवलिंगावर जाऊन चादर चढवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, तर अनेक दशकांच्या परंपरेनुसार दुरूनच चादर दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे त्या समाजातील लोकांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details