महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लसीकरणाचे संदेश 48 तास आधी पाठवण्याची गरज - डॉ. मोहन जोशी - सायन रुग्णालय लसीकरण बूथ न्यूज

24 ते 48 तास आधी संदेश पाठवल्यास कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेता येतील आणि लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे मत मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविडच्या काळात काम केले आहे. त्यांनी मृत्यू जवळून पाहिले आहेत, असेही ते म्हणाले.

सायन रुग्णालय लसीकरण बूथ न्यूज
सायन रुग्णालय लसीकरण बूथ न्यूज

By

Published : Jan 19, 2021, 6:04 PM IST

मुंबई - शनिवारी लसीकरणादरम्यान कोविन अ‌ॅपमध्ये अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती दिली होती. आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. 24 ते 48 तास आधी संदेश पाठवल्यास कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेता येतील आणि लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे मत मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.

लसीकरणाचे संदेश 48 तास आधी पाठवण्याची गरज - डॉ. मोहन जोशी

लसीकरणाला सुट्टी

मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जोशी बोलत होते. यावेळी बोलताना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविन अ‌ॅपवरून संदेश पाठवले आहेत. पालिकेच्या वॉर रूमकडूनही संदेश पाठवले जात आहेत. फोनही केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी असल्याने त्यांना ऑपरेशन किंवा इतर आपात्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयात थांबावे लागते, लसीकरणासाठी सुट्टी मिळत नाही. यामुळे ते लसीकरणाला पोहचू शकत नाहीत. लसीकरणाचे संदेश संबंधितांना 24 ते 48 तास आधी पाठवल्यास ते लसीकरणासाठी सुट्टी घेऊन येऊ शकतील. यामुळे लसीकरणाचा आकडा वाढू शकतो, असे डॉ. जोशी म्हणाले.

हेही वाचा -मुंबईत लसीकरणाला सुरळीत सुरुवात, कोविन अ‌ॅपमध्येही सुधारणा


आरोग्य कर्मचारी लस घेतील

शनिवारी पहिल्याच दिवशी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज आहे का असे विचारले असता, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविडच्या काळात काम केले आहे. त्यांनी मृत्यू जवळून पाहिले आहेत. पहिल्याच दिवशी सायन रुग्णालयातील ४३ डॉक्टरांनी लस घेतली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनीही लस घेतली आहे. इतर रुग्णालयामधील मुख्य डॉक्टरांनी लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर आमच्यावर कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत. हे पाहून आता सर्व कर्मचारी आपले नाव लसीकरणाच्या यादीमध्ये येण्याची वाट बघत आहेत. यादीमध्ये नाव आल्यावर इतर आरोग्य कर्मचारी लस घेतील, असा विश्वास डॉ. जोशी यांनी व्यक्त केला आहे.

सध्या ४०० चे उद्दिष्ट

सायन रुग्णालयात लसीकरणाचे पाच बूथ आहेत. त्याठिकाणी दिवसाला ५०० जणांना लस देता येऊ शकते. सायन रुग्णालयात १० बूथ करता येऊ शकतात. त्यानंतर १ हजार लोकांना लस देता येऊ शकेल. सध्या दिवसाला ४०० लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

हेही वाचा -पनवेल पालिका क्षेत्रात 11 जणांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट; उलटी, तापाची लक्षणे

ABOUT THE AUTHOR

...view details