महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फक्त मराठी चॅनलवरील सिंधू मालिकेचे 100 भाग पूर्ण, केक कापून टीमचं खास सेलिब्रेशन - बालकलाकार अदिती जलतारे

सिंधू मालिकेने नुकताच 100 भागांचा पल्ला गाठला. शतकपूर्तीचा सोहळा मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. समाज माध्यमावरूनही सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना फक्त मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्याम मळेकर यांनी व्यक्त केली.

sindhu serial
फक्त मराठीवरील सिंधू मालिकेचे 100 भाग पूर्ण, टीमचं केक कापून खास सेलिब्रेशन

By

Published : Nov 30, 2019, 3:23 PM IST

मुंबई -सिंधू मालिकेने नुकताच 100 भागांचा पल्ला गाठला. मालिकेच्या संपूर्ण टीमनेसेटवर केक कापूनशतकपूर्तीचा सोहळा साजरा केला. समाज माध्यमावरूनही सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना फक्त मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्याम मळेकर यांनी व्यक्त केली.

फक्त मराठीवरील सिंधू मालिकेचे 100 भाग पूर्ण, टीमचं केक कापून खास सेलिब्रेशन

हेही वाचा - 'कमांडो ३': दमदार अ‌ॅक्शनने विद्युतने जिंकली प्रेक्षकांची मने, पाहा प्रतिक्रिया

'सिंधू... एका सामान्य मुलीची असामान्य कथा' ही एकोणिसाव्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा आहे. यात तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास विशेषतः शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड दाखवण्यात आली आहे. 'सिंधू' ही काल्पनिक मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरत आहे. त्यातच स्वातंत्र्यापूर्वीचे एकोणिसाव्या शतकातील वातावरण, आचार-विचार, केशभूषा, वेशभूषा, वाडे अशा अनेक निराळ्या गोष्टी यात पाहायला मिळत आहेत.

बालकलाकार अदिती जलतारे सिंधूची भूमिका साकारत असून तिच्यासोबतच श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार, वंशिका इनामदार असे आणखीनही चिमुकले कलाकार आहेत. त्यासोबतच गौरी किरण, पूजा मिठबावकर, शाश्वती पिंपळीकर, प्रसाद दाबके, निकिता कुलकर्णी, नचिकेत जोग, मिलिंद पेमगिरीकर असे अनेक कलाकार या मालिकेतून महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. सिंधू मालिकेची संकल्पना श्रीरंग गोडबोले अशा चतुर व्यक्तिमत्त्वाची असून त्यांच्याच इंडियन मॅजिक आय कंपनीतर्फे या कलाकृतीची निर्मिती होत आहे. विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या सुंदर कथेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्नील मुरकर सांभाळत आहेत.

सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमुळे सिंधू मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली असून, मालिकेतील ट्विस्ट बघता येत्या काळात नेमके काय होणार? याचे कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी फक्त मराठीच्या या मालिकेला भरभरून प्रेम व सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिंधूमधील कलाकारांसह सर्व बालकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. मालिकेचा पुढील प्रवास आणखी उत्कंठावर्धक होणार असल्याचे दिसून येईल.

हेही वाचा - MISSION MANGAL REVIEW: ताऱ्याप्रमाणे चमकणारं प्रत्येक पात्र, कलाकारांच्या मंगळ मोहिमेला यश

ABOUT THE AUTHOR

...view details