महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत राजपूत प्रकरण: सिमॉन खंबाटाची एनसीबीकडून पाच तास चौकशी - सिमॉन खंबाटा एनसीबी चौकशी

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन समोर आले. त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला एनसीबीने चौैकशीसाठी बोलावले होते. या चौकशी दरम्यान रियाने बॉलिवूडमधील काही नावे घेतली होती. त्यानंतर आणखी काही जणांना एनसीबीने चौैकशीासाठी समन्न बजावले आहे.

Simone Khambatta
सिमॉन खंबाटा

By

Published : Sep 24, 2020, 11:06 AM IST

Updated : Sep 24, 2020, 3:48 PM IST

मुंबई- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान जया सहा हिच्या व्हाट्सअप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा, सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. समन्स बजावण्यात आल्यानंतर आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयामध्ये सीमोन खंबाटा हजर झाली. एनसीबीने सिमॉनची ५ तास चौकशी केली. तिला आता घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रुती मोदी हिची मात्र, अद्याप चौकशी सुरू आहे.

सिमॉन खंबाटाची एनसीबी चौकशी

या प्रकरणात नाव आलेल्या रकुल प्रीत सिंह हिच्या पीआर टीमकडून मात्र, रकुल प्रीतला या संदर्भात कुठल्याही चौकशीचे समन्स अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रकुल प्रीत सिंग ही एनसीबी समोर चौकशीसाठी कधी हजर होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांना एनसीबीकडून समन्स मिळाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे त्यांनाही या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. 25 सप्टेंबरला सारा अली खान हिला एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्याबरोबरच दीपिका पदुकोण हिलाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकसमोर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Last Updated : Sep 24, 2020, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details