मुंबई - गुरुवारी पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला झाला होता. यात वीरमरण आलेल्या ४५ जवानांना मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (सीएसएमटी) रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला.
वीरमरण आलेल्या जवानांना मुंबईकरांची रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली
पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या ४५ जवानांना मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (सीएसएमटी) रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. आज (शुक्रवार) आणखी २ जवानांना वीरमरण आले. ३८ जवानांवर काश्मीरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात अनेक शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईकरांनीही सीएसएमटीवर रांगोळी काढून वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. तसेच या घटनेविरोधात तीव्र भावना व्यक्त करून हल्ला करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली आहे.