महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 2, 2023, 7:53 PM IST

ETV Bharat / state

Liquor Sales in State : या वर्षी राज्यात मद्यविक्रीत लक्षणीय वाढ; महसुलातदेखील भरघोस वाढ

कोरोना काळात मद्यविक्रीला आळा घातला ( Significant Increase in Liquor Sales in State ) होता. या काळात मद्यविक्रीपासून मिळणाऱ्या ( Economy has Returned to its Former Position ) महसुलातदेखील कमतरता आली होती. परंतु, कोरोना काळात डबघाईला गेलेल्या महसुलात यंदा भरघोस वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये विक्रीतून १७,११७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला ( This Year A Substantial Increase in Revenue ) होता. चालू आर्थिक वर्षाच्या केवल ९ महिन्यांमध्ये १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत मोठ्या महसूल प्राप्त होण्याची आशा आहे.

Significant Increase in Liquor Sales in State This Year A Substantial Increase in Revenue as Well
या वर्षी राज्यात मद्यविक्रीत लक्षणीय वाढ; महसुलातदेखील भरघोस वाढ

मुंबई :कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षांमध्ये ( Significant Increase in Liquor Sales in State ) मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्यपींच्या मद्य सेवनामुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा झाला ( Economy has Returned to its Former Position ) आहे. कोरोनामध्ये राज्याचा महसूल पूर्णतः थांबला ( This Year A Substantial Increase in Revenue ) होता. परंतु, यंदा २ एप्रिल ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसुलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यांत राज्याच्या तिजोरीत सुमारे १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. राज्यासाठी ही मोठी बाब आहे.

देशी-विदेशी मद्यविक्रीत वाढकोरोनाकाळात सर्वच ठप्प झाले असताना राज्यातील मद्यविक्रीसुद्धा थंडावली होती. मात्र, आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीही जोमात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ३४.५ कोटी लिटर देशी मद्याची विक्री झाली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा याच काळात राज्यात २५ कोटी लिटर देशी मद्य विकले गेले होते. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विदेशी मद्याची २३.५ कोटी लिटर विक्री झाली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात १७.५ कोटी लिटर विदेशी मद्य विकले गेले आहे.

राज्यात मद्याच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ

बिअरच्या विक्रीतसुद्धा वाढकोरोनाकाळात बिअरची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. आता बिअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या ८ महिन्यात २३ कोटी लिटर बिअरची विक्री झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या याच काळात २१ कोटी लिटर बिअरची विक्री झाली होती. उच्चभ्रू वर्गाची पसंती असणाऱ्या वाईनला देखील मागणी वाढल्याचे दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या काळात राज्यात ८८ लाख लिटर वाईनची विक्री झाली आहे. २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या याचकाळात ६६ लाख लिटर वाईनची विक्री केली गेली होती.

उद्दिष्ट साध्य होण्याची आशाकोरोनाकाळात डबघाईला गेलेल्या महसुलात यंदा भरघोस वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये विक्रीतून १७,११७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या केवल ९ महिन्यांमध्ये १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे मद्यविक्रीतून २२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी आशा उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details