महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळीतील कैलास बिझनेस पार्कला आग - Signboard Catches Fire news

विक्रोळीच्या कैलास बिझनेस पार्कमध्ये हायरिक्स या नावाची ३५ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकाला आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

Signboard Catches Fire At Mumbai High-rise, No Injuries
विक्रोळीतील कैलास बिझनेस पार्कला आग

By

Published : Jul 4, 2020, 11:46 PM IST

मुंबई - विक्रोळीच्या कैलास बिझनेस पार्कमध्ये हायरिक्स या नावाची ३५ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकाला आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना आज (शनिवार) रात्री घडली.

हायरिक्स इमारतील लागलेली आग...
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील कैलास बिझनेस पार्कमधील कॉर्पोरेट इमारत असलेल्या हायरिक्स इमारतीच्या १९ व्या मजल्यावर एक इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक आहे. या फलकाला अचानक आग लागली. ही बाब इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आली. तेव्हा त्याने अग्निशमन दलाला यांची माहिती दिली.

तेव्हा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. या बिझनेस पार्कमधील कार्यालये लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे जीवीतहानी टळली.

ABOUT THE AUTHOR

...view details