मुंबई -आदिवासी जिल्ह्यातील न्युमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी त्या लहान बालकांना न्युमोकोकल लसीकरण करण्यासाठी सिद्धिविनायक न्यास मंडळ १० कोटी रुपये निधी देणार असल्याची माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमुख कारण न्यूमोनिया आजार आहे. हा आजार अधिक प्रमाणात आदिवासी भागात आढळून येत आहे. लहान बालकांना योग्यवेळी न्युमोकोकल लसीकरण केल्याने बालकांमध्ये न्यूमोनिया आजारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल.
हेही वाचा -आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कृष्णकुंजवर बंद दाराआड चर्चा
महाराष्ट्रात १६ आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यामुळे १६ जिल्ह्यांपैकी नंदुरबार, पालघर, अमरावती, गडचिरोली, नाशिक, पालघर व नाशिक या ५ जिल्ह्यातील ०-१ वर्ष वयोगटातील अंदाजे १.४१ लक्ष बालकांना पहिल्या टप्प्यात या लसीचे लसीकरण करता येईल. न्यूमोकोकल लस ही ४ डोसेसच्या डायलमध्ये उपलब्ध असून प्रति व्हायलची किंमत ८०० रुपये आहे. त्यामुळे या ५ आदिवासी जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यासाठी अंदाजे १० कोटी खर्च अपेक्षित आहे. तो खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -जागतिक दर्जाच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली "सह्याद्री" अतिथी गृहावर बैठक