महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिद्धीविनायक गणपती न्यासकडून नागपाडा पोलीस रुग्णालयास दीड कोटीचा धनादेश - सिद्धिविनायक गणपती

सिद्धीविनायक न्यासकडून पुलवामा हल्ल्यातील वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या सहायतेसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर यांच्याकडे देण्यात आला.

धनादेश देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धनादेश देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jan 9, 2020, 1:54 PM IST

मुंबई- नागपाडा पोलीस रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी आज श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासच्या वतीने दीड कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

धनादेश देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


तसेच पुलवामा हल्ल्यातील वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या सहायतेसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

त्यावेळी न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त संजय सावंत, भरत परीख, महेश मुदलियार, गोपाळ दळवी, सुबोध आचार्य, पंकज गोरे, कार्यकारी अधिकारी वैभवी चव्हाण, प्रियांका छापवाले उपस्थित होते.

हेही वाचा - आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, 'सामना'तून भाजपला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details