मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सुशांत याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी हा फरार झाल्यानंतर त्यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती. यानंतर सिद्धार्थ पिठानीकडून एनडीपीएस न्यायालयमध्ये लग्नासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केले आहे.
सुशांत सिंग प्रकरण; सिद्धार्थ पिठानीचा लग्नासाठी जामीन अर्ज - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या लेटेस्ट न्यूज
सिद्धार्थ पिठानी याच्याकडून एनडीपीएस न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येत्या 26 जून रोजी हैदराबाद येथे त्याचे लग्न असल्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.
हैदराबाद येथून अटक
सुशांत सिंग राजपूत याने जून 2020मध्ये ज्या वेळेस त्याच्या बांद्र्यातील घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळेस घरात सिद्धार्थ पिठानी हा हजर होता. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सीबीआय, ईडीकडून वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आल्यानंतर सिद्धार्थ पिठानी हा फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास हैदराबाद येथे जाऊन एनसीबीने अटक केली आहे. सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरातील कर्मचारी सॅम्युअल मिरांडा व दीपेश सावंत यांनी एनसीबीला दिलेल्या जबाबानुसार सुशांत सिंग राजपूत यास गांजा या अमली पदार्थाचा पुरवठा सिद्धार्थ पिठानी करून देत असल्याचं सांगितले आहे. त्यानंतर त्यास अटक करण्यात आलेली होती.
26 जून रोजी हैदराबाद येथे लग्न
सिद्धार्थ पिठानी याच्याकडून एनडीपीएस न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येत्या 26 जून रोजी हैदराबाद येथे त्याचे लग्न असल्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. याबरोबरच केवळ या प्रकरणातील 2 व्यक्तींच्या नावावरून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ मिळाले नसल्यामुळे त्यास जामीन देण्यास कुठेही अडचण नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. यावरील पुढील सुनावणी 16 जून रोजी होणार आहे.