मुबंई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत गौतम बुद्धाच्या केलेल्या गौरवपर वक्तव्यावर मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. विश्वाचा संसार सुखाने चालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हवेत, बुद्ध नव्हे, असे म्हणत भिडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. बुद्ध देशासाठी उपयोगाचा नाही, असे वक्तव्य भिडेंनी सांगितले केले. यावर वंचित बहुजन आघाडीने भिडेंच्या वक्तव्यावर भाजप गप्प का?, असा सवाल उपस्थित केला आहे. भारताने जगाला बुद्ध दिला, असे पंतप्रधान म्हणाले होते. भिडे यांनी या वयात असे बालिश वक्तव्य करणे, बंद करावे. जगाने गौतम बुद्ध यांचे विचार मान्य केले आहेत. भिडे यांनी फोडाफोडीचे राजकारण थांबावावे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत.
'संभाजी भिडे यांनी या वयात बालिश वक्तव्य करू नये' - assembly election of maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत गौतम बुद्धाच्या केलेल्या गौरवपर वक्तव्यावर मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला यावर भाजप गप्प का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी उपस्थित केला आहे.
भिडेंच्या विधानावर प्रतिक्रिया द्यावी असे आम्हाला वाटत नाही. यावर भाजपने बोलले पाहिजे कारण भिडेंनी खुद्द पंतप्रधानांच्या विधानाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास बहुजनांनी आता समोर आणला आहे. त्यामुळे असे धर्मांध बहुजनांमध्ये फुट पाडत आहेत. पण, सध्या बहुजनांना जिजाऊ माता, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत कबीर, संत तुकाराम या सर्वांच्या विचाराबद्दल माहिती आहे, त्यामुळे आता बहुजनांमध्ये फुट पाडणे शक्य नाही, असे मोकळे म्हणाले.
हेही वाचा - पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे