महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आनंदराज आंबेडकरांच्या विरोधातील फेक न्युज थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू'

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे. आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वृत्तवाहिन्यांवर येत आहेत.

आनंदराज आंबेडकर

By

Published : May 5, 2019, 3:11 PM IST

मुंबई - आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधातील फेक न्युज तातडीने थांबवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक खोट्या बातम्या दिल्लीसह राज्यातील काही वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मोकळे म्हणाले.

रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे


मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एका वृत्तवाहिनीने आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. तर त्यानंतर राज्यातील एका मोठ्या वर्तमानपत्रांनीही तीच बातमी देऊन आनंदराज आंबेडकरांची बदनामी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे. आनंदराज आंबेडकर हे कुठल्याही स्थितीत काँग्रेस अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी कुठल्याही माध्यमाने त्यांच्याशी चर्चा केली नसतानाही अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांची बदनामी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात आकारास आलेल्या वंचित बहुजन आघाडीला रोखण्याचे हे काम केले जात असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही स्थितीत रोखता येणार नाही. यामुळेच अशा प्रकारची बदनामी काही माध्यमे सुपारी घेऊन करत असल्याचा आरोप मोकेळे यांनी केला. आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, लवकरच पक्षांकडून यासंदर्भातली भूमिका जाहीर केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details