मुंबई:मुंबई सायबर सेलने उत्तराखंडमधून अटक केलेली आरोपी श्वेता सिंगचा जामीन अर्ज बांद्रा कोटाने फेटाळल्यानंतर श्वेता सिंगच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने मुंबई सायबर सेलला या प्रकरणात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. सायबर सेलने रिप्लाय सादर करत श्वेता सिंगच्या जामीनला विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Bully Buy App Case: बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्वेता सिंगच्या जामीनावर बुधवारी सुनावणी - Mumbai Sessions Court
बुली बाई ॲप प्रकरणात (Bully Buy App Case) मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने (By Mumbai Police Cyber Cell) अटक केलेली महिला आरोपी श्वेता सिंगच्या (Accused Shweta Singh) जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सायबर सेलने या प्रकरणात श्वेता सिंगचा सहभाग असल्याचे सांगत ॲप संदर्भात पूर्ण माहिती तीला होती. तसेच तीचे विविध सोशल मीडिया अकाउंटही या ॲप साठी तयार करून वापरले असा दावा केला. उद्या बुधवारी तीच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.

बुली बाई ॲप प्रकरणात श्वेता सिंग यांना उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलने अटक केले होते. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल झा याला बेंगलोर मधून अटक केल्यानंतर त्याच्या माध्यमातून श्वेता सिंग ला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी 7 जानेवारी रोजी श्वेता सिंगला मुंबईत आल्यानंतर 3 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती, त्यानंतर तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
बुली बाई एक असे ॲप्लिकेशन आहे जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो टाकले जात होते तसेच त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो टाकण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपीं विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केरत तपास सुरु केला होता.