महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रपती राजवटीचा सरकार बनवण्यावर कोणताही अडथळा नाही - श्रीहरी अणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सरकार बनवण्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती राजवटीनंतर जोपर्यंत मध्यावधी निवडणूक जाहीर होत नाही, तोपर्यंत बहुमत असल्याचे पत्र देऊन, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

श्रीहरी अणे

By

Published : Nov 12, 2019, 6:41 PM IST


मुंबई- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सरकार बनवण्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची शिफारस मंजूर करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.

हेही वाचा - 'हम होंगे कामयाब'; संजय राऊतांचे रुग्णालयातून ट्विट

एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू असतानाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता स्थापनेसंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापने संदर्भात दावा दाखल करण्याची मुदत राज्यपालांनी दिली होती. मात्र, दुपारीच राष्ट्रवादीकडून ही मुदत 48 तासांसाठी वाढवून देण्याची मागणी केल्याचे पत्र राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठवले. याच आधारावर राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. मात्र, आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार स्थापन करण्याबाबत कायदे तज्ञांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अणे यांनी राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन करण्यात अडथळा ठरत नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा - राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना- दीपक सावंत

राष्ट्रपती राजवटीनंतर जोपर्यंत मध्यावधी निवडणूक जाहीर होत नाही, तोपर्यंत बहुमत असल्याचे पत्र देऊन, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details