महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shraddha murder viral letter copy : श्रद्धाने खून होणार अशी भीती व्यक्त केली होती; पत्राची प्रत वायरल - complaint letter revealed new secrets

श्रद्धा वालकर हत्या (shraddha walker murder) प्रकरणात आफताबने आधिही श्रद्धाला मारहाण केली होती. तेव्हा श्रद्धाने जीवाला धोका असून आफताब मारहाण करत असल्याची लेखी तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाच्या पत्राची प्रत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. (Shraddha murder viral letter copy) ई टीव्ही भारत या पत्राची पुष्टी करत नाही

Shraddha murder case
श्रद्धा खून प्रकरण

By

Published : Nov 23, 2022, 11:18 AM IST

Updated : Nov 23, 2022, 1:29 PM IST

मुंबई:श्रद्धा वालकर हत्या (shraddha walker murder) प्रकरणात आरोपी आफताब बाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धाने आपल्या जीवाला धोका असून आरोपी आफताब तिला मारहाण करत असल्याची लेखी तक्रार श्रद्धाने पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाच्या पत्राची प्रत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. ही तक्रार श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीत श्रद्धाने म्हटले आहे की, आरोपी आफताब तिला बेदम मारहाण करतो. (Shraddha murder viral letter copy)

श्रद्धाने खून होणार अशी भीती व्यक्त केली होती

मारहाण केलेल्याच्या जखमा:आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यानचा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर आफताबने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. आफताबने केलेल्या मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते. तिच्या मानेलाही दुखापत झाली होती, अशी माहिती ओझोन हॉस्पिटलच्या डॉ. साईप्रसाद शिंदे दिली आहे.

खुनाचा गुन्हा दाखल : 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) श्रद्धा वॉकरची हत्या (shraddha walker murder case Delhi) करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक (Aftab amin poonawa arrested) करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले (shraddha walker body dismembered) आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.

दोघांचे होते प्रेमसंबंध -वसईच्या संस्कृती काँप्लेक्समधील राहणाऱ्या श्रद्धा वालकरचे ( Shraddha Walkar Murder Case ) वय (२७) त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला ( Aftab killed shraddha Walkar) याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते.

काय आहे पत्रात :श्रद्धाने त्या पत्रात लिहीले आहे की, आज त्याने गुदमरून मला मारण्याचा प्रयत्न केला. तो मला ठार मारेल, जखमा करून आणि माझे तुकडे करून फेकून देतो असे ब्लॅकमेल करतो. 6 महिने झाले तो मला मारतोय पण पोलिसात जाण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. त्याच्या आई-वडिलांना माहीत आहे की त्याने मला मारले आणि त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्यासोबत राहण्यास तयार नाही, त्यामुळे तो मला मारण्यासाठी मला ब्लॅकमेल करत आहे.

श्रद्धा खून प्रकरणाच्या पत्राची प्रत

शरीराचे केले ३५ तुकडे -आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या ( Delhi Murder Case ) केली होती. नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकर मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही.

हत्या केल्याची कबुली - माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.

(येथे दिलेल्या श्रद्धा खून प्रकरणाच्या पत्राची प्रत सोशल मीडियावर वायरल होत आहे. ई टीव्ही याची पुष्टी करत नाही.)

Last Updated : Nov 23, 2022, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details