मुंबई : दिल्ली आणि वसई पोलीस यांचा संयुक्त तपास योग्य पद्धतीने सुरू ( Shraddha Murder Case )आहे. आफताबच्या कुटुंबाचाही सखोल तपास ( Aftab family investigated ) व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले ( Devendra Fadnavis justice assurance ) आहे. आफताब व त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे. नीलम गोऱ्हे आणि किरीट सोमय्या यांनी घरी येऊन मला धीर दिला त्याबद्दल आभार. जेवणाचा आणि इतर खर्च किरीट सोमय्या यांनी केला. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे संयुक्तपणे काम सुरु आहे. तुळींज पोलीस ठाण्याकडून सुरुवातीला असहकार्य मिळाले. अन्यथा माझी मुलगी आता जिवंत असती. असे श्रद्धाच्या वडिलांनी म्हटले आहे.
संपूर्ण प्रकरण :5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) श्रद्धा वालकरची हत्या ( shraddha walker murder case Delhi ) करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक ( Aftab amin poonawa arrested ) करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले ( shraddha walker body dismembered ) आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले होते.
श्रद्धाचा मृत्यू दुःखदायक : श्रद्धा वालकर हिचे दिल्लीत तिच्यासोबत राहणाऱ्या प्रियकर आफताप पुनावाला याने हत्या केली. त्यानंतर प्रथमच श्रद्धाचे वडील विकास हे प्रसिद्धी माध्यमांसमोर आले आणि तुळींज पोलीस ठाण्यावर ठपका ठेवला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी विकास पालकर यांनी केली आहे. अठरा वर्षा नंतर दिल्या जाणाऱ्या स्वतंत्र्यावरती विचार व्हायला हवा तसेच माझ्या मुलीचे जे झाले ते अत्यंत दुःखदायक असून यापुढे असे कोणाचे होऊ नये अशी माझी अपेक्षा असल्याचे विकास वालकर यांनी सांगितले.