महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री श्रद्धा कपूर चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल - shraddha kapoor arrives at ncb

अभिनेत्री श्रद्धा कपूर आज चौकशीसाठी अंमली पदार्थ नियंत्रक विभाग कार्यालयात पोहोचली आहे.

अभिनेत्री श्रद्धा
अभिनेत्री श्रद्धा

By

Published : Sep 26, 2020, 12:02 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यानुसार आज बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण , श्रद्धा कपूर , सारा अली खान या तिन्ही अभिनेत्री एनसीबी पथकासमोर चौकशीसाठी हजर होत आहेत. श्रद्धा कपूर ही आज चौकशीसाठी कार्यालयात हजर झाली आहे. दरम्यान काल रकुल प्रीत सिंह आणि करिष्मा यांची एनसीबीने चौकशी केली आहे.

सारा अली खान व श्रद्धा कपूर या दोघी सुशांत सिंग राजपूत सोबत त्याच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर जात होत्या. त्या ठिकाणी अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आलेल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details