महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शोविक चक्रवर्ती, मिरांडा, कैझेन इब्राहिम यांना सायन रुग्णालयात नेले

काल (शुक्रवार) रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैझेन इब्राहिम यांना अटक केली होती. त्यांना आज (शनिवार) मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना शीव रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी नेण्यात आले. एनसीबीला या प्रकरणी मिळालेल्या पुराव्यांवरून सुशांतला अमलीपदार्थाच्या नशेची जाणीवपूर्वक सवय लावली असावी का, याविषयी संशय व्यक्त होत आहे.

सुशांत सिंह राजपूत न्यूज
सुशांत सिंह राजपूत न्यूज

By

Published : Sep 5, 2020, 12:53 PM IST

Updated : Sep 5, 2020, 1:00 PM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. काल (शुक्रवार) रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैझेन इब्राहिम यांना अटक केली होती. त्यांना आज (शनिवार) मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना शीव रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी नेण्यात आले.

दरम्यान, अटक केलेल्या जैद आणि अब्दुल बासित परिहार यांनी मुंबईच्या सेशन कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीने या दोन आरोपींना अटक केली होती. शोविक, मिरांडा, कैझेन यांची शीव रुग्णालयात कोविड चाचणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. येथे आरोपींच्या एनसीबी रिमांडची मागणी केली जाणार आहे.

शोविक चक्रवर्ती, मिरांडा, कैझेन इब्राहिम यांना सायन रुग्णालयात नेले

शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अमली पदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, अमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्यानंतर सुशांतला अमलीपदार्थाच्या नशेची जाणीवपूर्वक सवय लावली असावी का, याविषयी संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी शोविकनंतर एनसीबीकडून रियाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनबीसीने अटक केलेल्या जैद याने चौकशीदरम्यान शोविकला अंमली पदार्थ पुरविल्याचे कबूल केले आहे. सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतरही जुलै महिन्यात सॅम्युअलने मिरांडाला अंमली पदार्थ दिल्याची कबुली जैद याने दिली आहे. यासाठी सॅम्युअलने त्याला जे पैसे दिले होते, ते शोविक चक्रवर्तीने पाठवले असल्याचे जैद याने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतकडे हाऊसकिपिंगचे काम करणारा दीपेश सावंत याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. सध्या एनसीबीकडून दीपेश सावंतचा जबाब नोंदवला जात आहे.

Last Updated : Sep 5, 2020, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details