मुंबई : महिला धोरणाच्या संदर्भात प्रस्ताव विधानसभेत मांडला गेल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी सर्व महिला आमदार सहभागी झाल्या. मात्र यावेळी आमदार सभागृहात आपली मते मांडत असताना महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा सभागृहात उपस्थित नव्हते.
सभागृहांन नोंद घ्यावी : महिला आमदार आपले प्रश्न मांडत असताना राज्याच्या महिला धोरणावर आपले विचार व्यक्त करत असताना ते गांभीर्याने नोंदवून घेतले गेले पाहिजेत. मात्र, सरकार पक्षाकडून महिला आणि बालविकास मंत्री उपस्थित नसल्याबाबत आमदार वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. तर किमान सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी तरी गांभीर्याने चर्चा ऐकायला पाहिजे, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले संजय कुंटे : वर्षा गायकवाड यांच्या विनंती नंतरही महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी तीव्रनापसंती दर्शवली. जर मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आजच्या दिवशी उपस्थित राहणे शक्य नव्हते त्यांना या खात्यात रस नसेल तर त्यांनी किमान आजचा दिवस तरी या खात्याचा प्रभार आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवायला हवा होता अशा शब्दात कुटे यांनी लोढा यांना घरचा आहेर दिला.