महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इतर धर्मावर टीका करताना शब्द सांभाळून वापरण्याची गरज - छगन भुजबळ - Sharjeel Usman statement Bhujbal reaction

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, कोणत्याही धर्माविरोधात बोलताना शब्द सांभाळून वापरण्याची गरज आल्याचे मत अन्न व नागरी पुरावठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

Chhagan Bhujbal reaction
छगन भुजबळ प्रतिक्रिया

By

Published : Feb 2, 2021, 3:49 PM IST

Updated : Feb 2, 2021, 4:35 PM IST

मुंबई - पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, कोणत्याही धर्माविरोधात बोलताना शब्द सांभाळून वापरण्याची गरज आल्याचे मत अन्न व नागरी पुरावठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ

हेही वाचा -कोळीवाड्याच्या जमिनींसंदर्भात नाना पाटोलेंचे महत्त्वाचे निर्देश

इतर धर्मासंदर्भात जर कोणी कडक शब्द वापरले, तर त्या धर्मातील लोकांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे, असे शब्द वापरताना विचार करावा, असे भुजबळ म्हणाले. या सोबतच आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली असून ती जोपासली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने आक्षेपार्य भाषण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. त्याने केलेले भाषण तपासण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

अर्थसंकल्पामुळे भाजपचे नेते आत्मनिर्भर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आत्मनिर्भर करणारा आहे, असे मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केले. त्यावर छगन भुजबळ यांनी भाजपला टोला मारत, या अर्थसंकल्पामुळे भाजपचे नतेच आत्मनिर्भर झाले आल्याचे ते म्हणाले. नाशिक मेट्रो आणि नागपूर मेट्रो याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला काही मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -लवकरच होणार बेस्टच्या ऐतिहासिक 'ट्राम'चे लोकार्पण

Last Updated : Feb 2, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details