महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोकेसी कोविड सेंटरमध्ये कोविशिल्ड लसीचा तुटवडा; लसीकरण बंद - बोकेसी कोविड सेंटरमध्ये कोविशिल्ड लसीचा तुटवडा

सोमवारी कोविशिल्डचे लसीकरण निर्धारित वेळेत पूर्ण केल्यानंतर मंगळवारसाठी 350 डोस उरले होते. डोस कमी असल्याने आधीच सेंटरकडून 5 हजार डोसेसची मागणी करण्यात आली होती. हे डोस रात्री 8 वाजेपर्यंत पोहचतील, असे सेंटरला कळवण्यात आले होते.

बी.के.सी
बी.के.सी

By

Published : Apr 20, 2021, 2:53 PM IST

Updated : Apr 20, 2021, 5:55 PM IST

मुंबई- शहरातील सर्वात मोठे लसीकरण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये कोविशिल्ड लसीचा प्रचंड तूटवडा निर्माण झाला आहे. आज (मंगळवार) या लसीकरण केंद्रात कोविशिल्डच्या केवळ 350 लस होत्या. त्या आज सकाळी तासाभरात संपल्या. त्यामुळं हे लसीकरण बंद करण्यात आल्याची बीकेसीचे कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांनी दिली आहे. सोमवारी रात्री कोविशिल्डचा साठा मुंबई महानगर पालिकेकडून येणार होता. पण तो आलाच नाही. त्यामुळे कोविशिल्डचे लसीकरण बंद करावे लागले. मात्र, कोव्हॅक्सिनचा आजच्या पुरता साठा असून त्याचे लसीकरण सुरू असल्याचेही डॉ डेरे यांनी सांगितले.

बोकेसी कोविड सेंटरमध्ये कोविशिल्ड लसीचा तुटवडा
आतापर्यंत 1 लाख 79 हजार जणांचे लसीकरणदेशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. बीकेसी कोविड सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान हे सेंटर मुंबईतील सर्वात मोठे आणि देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र म्हणून ओळखले जाते. या केंद्रात 22 युनिट्स आहेत. येथे सुरुवातीपासून कोविशिल्ड लस दिली जातेय. पण काही दिवसांपासून येथे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोसही दिला जात आहे. दरम्यान 16 जानेवारीपासून 19 एप्रिलपर्यंत या सेंटरवर 1 लाख 79 हजार जणांचे लसीकरण झाल्याचे डॉ डेरे यांनी सांगितले. दरम्यान अनेकदा लसीचा साठा अपुरा पडत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावत आहे. अन्यथा आम्ही आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा पार करून पुढे गेलो असतो असेही डेरेंनी स्पष्ट केले. मंगळवारी रात्री साठा आलाच नाहीसोमवारी कोविशिल्डचे लसीकरण निर्धारित वेळेत पूर्ण केल्यानंतर मंगळवारसाठी 350 डोस उरले होते. डोस कमी असल्याने आधीच सेंटरकडून 5 हजार डोसेसची मागणी करण्यात आली होती. हे डोस रात्री 8 वाजेपर्यंत पोहचतील, असे सेंटरला कळवण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारच्या लसीकरणाची तयारी सेंटरकडून सुरू होती. पण रात्री उशिरापर्यंत साठा आलाच नाही. पहाटेपर्यंत वाट पहिल्यानंतर सेंटरने कोविशिल्डचे लसीकरण आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोव्हॅक्सिनचा 2200 डोसचा साठा उपलब्ध असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यासाठी बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज लसीकरण सुरू आहे. तर कोविशिल्डचा साठा उपलब्ध करून द्यावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. तो कधी मिळेल आणि लसीकरण कधी सुरू होईल हे आताच सांगता येत नसल्याचेही डेरे म्हणाले.
Last Updated : Apr 20, 2021, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details