महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोंबड्या विकण्याचा धंदा- मुख्यमंत्री, ...आज जगताप-विखेंचा प्रचार थंडावणार,..तर सुळे घरात घुसून मारतात - shivsena

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील तोफा आज थंडावणार..., भाजप दाभोलकरांच्याही मारेकरांना उमेदवारी देईल?, अहमदनगरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा, कसा सुरू आहे बहुचर्चीत माढा मतदारसंघाचा प्रचार या सारख्या राजकीय घडामोडींचा आढावा वाचा मतकंदन महाराष्ट्राचे मध्ये...

मतंकदन

By

Published : Apr 21, 2019, 2:03 PM IST


लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यातील प्रचार'तोफा' आज थंडावणार

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजता प्रचाराची सांगता होईल. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.वाचा सविस्तर

...तर भाजप पानसरे, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी देईल

ठाणे- भारतीय जनता पक्ष उद्या दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी देईल. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी कल्याण येथे केली. भिवंडी लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.वाचा सविस्तर

काँग्रेस-राष्ट्रवादीची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा - मुख्यमंत्री

अहमदनगर- काँग्रेसचे घोषणपत्र आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आपापल्या जबाबदारीवर ठरवावे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जत येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस आणि सुनील साळवे यांच्यासह सेना-भाजप-आरपीआय युतीचे अनेक नेते उपस्थित होते.वाचा सविस्तर

अहमदनगर : सुजय-संग्रामच्या प्रचार'तोफा' आज थंडावणार

अहमदनगर - राज्यात ज्या विशेष लढती आहेत, त्यात प्रमुख लक्षवेधी लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विरुद्ध युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या २३ एप्रिलला मतदान होणार असल्याने आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.वाचा सविस्तर

मुंबई हल्ल्यावेळी ज्या बोटीतून दहशतवादी आले, त्या बोटीच्या मालकाला का पकडले नाही? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

कोल्हापूर- मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी करकरेंना मारणारे दहशतवादी बोट घेऊन चार दिवस पोरबंदरमध्ये होते. त्या बोटीच्या मालकाला तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी का पकडले नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते कोल्हापुरात उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलत होते.वाचा सविस्तर

मोदी पाकिस्तानला घरात घुसून मारतात मात्र, सुप्रिया सुळे आमच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देतात - मुख्यमंत्री

पुणे - मोदी पाकिस्तानला घरात घुसून मारतात. मात्र, सुप्रिया सुळे आमच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर आणि रामदास आठवले यांनी खडकवासल्यात सभेला संबोधित केले.वाचा सविस्तर

माढा मतदारसंघ : मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे बंधू यांच्यात टोकाची लढाई

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला असून मोहिते-पाटलांसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा लढा ठरणार आहे, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावंच्या-गावं पिंजून काढायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत लढा लोकसभेचा पण, चर्चा मात्र मोहिते-शिंदेंच्या राजकीय शह-काटशहाची सुरु आहे. त्यातूनच परस्परांच्या विरोधात टीकेच्या फैरी झडत आहेत.वाचा सविस्तर

शरद पवार यांचे वय झाले तरी खोटे बोलण्याची सवय गेली नाही - नितीन गडकरी

रायगड- अनंत गीते हे संसदेत जांभई देण्यासाठी तोंड उघडतात, असे शरद पवार बोलले होते. त्यांच्या या वाक्याचे मला वाईट वाटले. शरद पवार यांचे वय झाले, तरी खोटे बोलण्याची सवय काही गेली नाही, असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांना लगावला.वाचा सविस्तर

'मोदी' चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ दे.. विवेक ओबेरॉयचे साईंना साकडे

अमदनगर - 'मोदी' चित्रपटाचा नायक विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक संदीप सिंग मनिष आचार्य यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details