मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त शिवसेनेच्यावतीने शिवाजी पार्कवर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करत राज्याच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले असल्याचा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार कार्यक्रमही मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा - डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार
शिवसेनेने आपल्या मुखपत्रात सांगितले, की बाळासाहेबांना आधी शिवसेनेला राजकारणात व निवडणुकीच्या आखाड्यात उतरवायचे नव्हते, पण नंतर त्यांनी विचार बदलाला. "आमच्या पोरांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या काय? आयुष्यभर फक्त वडापावच विकायचा काय?" असे म्हणून त्यांनी आयुष्यभर सत्ता आल्याशिवाय विकास शक्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्याच्या विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. अशाप्रकारे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - 'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत'