मुंबई- एकीकडे सत्ता स्थापन केव्हा होणार, या प्रश्नाने जनता त्रस्त असताना शिवसेनेचे आमदार मजेत असल्याचे दिसून येत आहे. पक्षातील आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थाबंवले आहे. हे आमदार आज समुद्रकिनारी सेल्फी घेत फेरफटका मारताना दिसले आहे.
जनता त्रस्त आमदार मस्त; शिवसेनेचे 'द रिट्रीट' मधील आमदार समुद्रकिनारी - Shiv Sena MLA New News Mumbai
द रिट्रीट हॉटेल हे समुद्रकिनारी असून निसर्गरम्य वातावरणात आहे. सेनेचे आमदार गेल्या दोन दिवसापासून घरापासून दूर आहे. मात्र, आज काही आमदारांनी समुद्रकिनारी फेरफटका मारला तर काहींना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
शिवसेनेचे ६४ आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या सर्व आमदारांना मलाड मार्वे रोड येथील सेवन स्टार द रिट्रिट या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. द रिट्रीट हॉटेल हे समुद्रकिनारी असून निसर्गरम्य वातावरणात आहे. सेनेचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून घरापासून दूर आहेत. मात्र, आज काही आमदारांनी समुद्रकिनारी फेरफटका मारला तर काहींना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. अवकाळी पावसाळामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे. तसेच राज्यातील जनतेला विकासासाठी सक्षम शासनाची गरज आहे. मात्र, अशा वेळी सेनेचे आमदार फेरफटका मारताना दिसल्याने सनेला राज्यातील परिस्थितीची काहीच चिंता नाही का? हा प्रश्न समोर उद्भवला आहे.
हेही वाचा-अयोध्येचा निकाल ऐकायला बाळासाहेब हवे होते - राज ठाकरे