मुंबई- युतीच्या घोषणेनंतर काही लोकांचे हायपर टेन्शन कमी झाले तर काही लोकांचे वाढले. नेमके काय करावे?, कधी खावे? काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे टेन्शन वाढल्याने 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' यांच्यासोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी केंद्रांचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या २ दिवसांपूर्वी झालेल्या युतीच्या घोषणेनंतर काही लोकांचे हायपर टेन्शन कमी झालं तर काही लोकांचं वाढलं. आजकाल कोणी सांगतात दिवसातून दोनदाच खा, काही म्हणतात दर २ तासांनी खा, नेमके काय करावे, कधी खावे काहीच कळायला मार्ग नव्हता. यामुळे टेन्शन वाढल्याने 'ना खाऊंगा ना खाने दूंगा', यांच्यासोबत जाण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले. त्यामुळेच राज्याच्या आणि देशासाठी युती केली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जालन्याची जागा शिवसेनेला मिळावी म्हणून आजही आग्रही असल्याचे शिवसेनेचे नाराज मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामुळे खूप त्रास झाला आहे. दोन दिवसात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Conclusion: