मुंबई -भाजप आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) यांच्या अडचणीत कमी होताना दिसत नाही आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा एक तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेना युवा नेते राहुल कनाल यांनी नितेश राणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. यासंदर्भात त्यांनी नितेश राणेंना नोटीसही पाठवली आहे. ( Rahul Kanal Sent Notice to Nitesh Rane )
राहुल कनाल यांच्या घरी काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी ट्विटवर ट्विट करत त्यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणात यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नितेश राणे यांनी 24 तासात यासंदर्भात माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राहुल कनाल यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी 24 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा नितेश राणेंना इशारा दिला आहे. नितेश राणेंनी माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीच्या दाव्यातून मिळणारी रक्कम सालियन कुटुंबियांना देण्याचा निर्णय राहुल कनाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -MP Priyanka Chaturvedi : घाऊक बाजारपेठेतील महागाई नियंत्रणात ठेवा- प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेच्या शून्यप्रहरात मागणी
राहुल कनाल हे परिवहन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई राणे विरुद्ध शिवसेना आज संघर्ष पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राणे कुटुंबीय यांच्या विरोधात वेगवेगळ्या कारणास्तव गुन्हे दाखल होत आहे. आज राणे पितापुत्रांनी विरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात दिशा सालीयन प्रकरणात अटकपूर्व जामिनावर निकाल येणार आहे.