मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. हिरामणी तिवारी (वडाळा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसैनिकांनी त्याला मारहाण करत त्याचे मुंडन करुन त्याला धमकीही दिली आहे.
उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास शिवसैनिकांची मारहाण - उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. हिरामणी तिवारी (वडाळा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवसैनिकांनी त्याला मारहाण करत त्याचे मुंडन करुन त्याला धमकीही दिली आहे.
![उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास शिवसैनिकांची मारहाण shivsena workers beat man for post against uddhav thackeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5467323-thumbnail-3x2-papapa.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हिरामणी तिवारी याने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची जालियावाला बागशी केलेल्या तुलनेचा फेसबुकवर विरोध केला होता. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.