मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी शिवाजी पार्क येथे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 1999 नंतर महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर 'जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरेन' असा संकल्प एका शिवसैनिकाने केला होता. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसैनिक किशोर वाघ यांचा हा संकल्प अखेर पूर्ण झाला आहे.
अखेर 'त्या' शिवसैनिकाचा संकल्प पूर्ण.. 20 वर्षांपासून फिरत होता अनवाणी - 20 वर्षांपासून अनवाणी फीरणारा शिवसैनिक
महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर 'जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरेन' असा संकल्प एका शिवसैनिकाने केला होता. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसैनिक किशोर वाघ यांचा हा संकल्प अखेर पूर्ण झाला आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी किशोर मुंबईत आले आहेत.
शिवसैनिक किशोर वाघ
हेही वाचा -आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार - शिवसैनिकांच्या भावना
आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी किशोर मुंबईत आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर स्वतः आपल्याला चप्पल द्यावी, अशी इच्छा किशोर यांनी व्यक्त केली आहे. शिवसैनिकाने मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.