मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बहुप्रतीक्षीत वादग्रस्त रामजन्मभूमीचा निकाल हिंदूच्या बाजूने दिला. या निकालाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे स्वागत केले. त्यावरून शिवसेनेने राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. तर ओवैसीवर निशाणा साधला आहे. मात्र राहुल गांधीच्या या कौतुकाला सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींची किनार असल्याचे दिसून येते.
राहुल गांधी यांचा हा समंजसपणा आहे; शिवसेनेने केले कौतुक - ayodhya verdict
अयोध्येचा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांचा हा समंजसपणा आहे, असे कौतुक शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामना मधून केले आहे. राम मंदिर निकाल प्रश्नी राहुल गांधीचे कौतुक करताना त्यांनी एमआयएम ओवेसींवरही निशाणा साधला आहे.
अयोध्येचा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांचा हा समंजसपणा आहे, असे कौतुक शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामना मधून केले आहे. राम मंदिर निकाल प्रश्नी राहुल गांधीचे कौतुक करताना त्यांनी एमआयएम ओवेसींवरही निशाणा साधला आहे. राहुल यांनी जो सांमज्यसपणा दाखवला तो ओवैसी यांनी दाखयला पाहिजे होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेवरून रणकंदन सुरू आहे, रविवारी संध्याकाळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आम्ही सत्ता स्थापनास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.