महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 7, 2019, 8:11 AM IST

ETV Bharat / state

'आरे'तील वृक्षतोड म्हणजे हिटलरशाहीच; शिवसेनेचा 'सामना'तून सत्ताधाऱ्यांना टोला

'आरे' येथील वृक्षतोड म्हणजे हिटलरशाहीच', असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून 'आरे'तील वृक्षतोडीबाबत सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - 'आरे' येथील वृक्षतोड म्हणजे हिटलरशाहीच', असा टोला शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. एका बाजूला झाडे जगवा, झाडे वाचवा म्हणायचे आणि त्याच वेळी मुंबईतील 2500 झाडे तोडायची. 'बेटी बचाव, बेटी पढाव'च्या घोषणा देणाऱ्या राज्यात सर्वात जास्त भ्रृणहत्या, ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात. तसेच जंगलतोडीच्या बाबतीतही होत आहे, असे म्हणत अग्रलेखातून 'आरे'तील वृक्षतोडीबाबत सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

निरपराध्यास शिक्षा होता कामा नये, हे भारतीय न्यायव्यवस्थेचे तत्व आहे. 'आरे'त निरअपराध झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांना मताचा अधिकार नाही म्हणून त्यांना शिक्षा देणे म्हणजे दडपशाही आहे, असे 'सामना'त म्हटले आहे. याशिवाय, गंगा-यमुना सफाई म्हणजे पंतप्रधान मोदींचा अजेंडा असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा -आरेचा प्रश्न हा फक्त मेट्रोचा नाही, तर बिल्डर लॉबीचा - प्रकाश आंबेडकर

जंगलांची कत्तल करून विकास करता येत नाही, असे म्हणत शिवसेनेने सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे मात्र, महापालिकेत शिवसेना सत्तेत असताना वृक्ष तोडीला परवानगी मिळाली. त्यामुळे, आरे प्रकरणात शिवसेना दुटप्पी भूमिका घेतेय का, असा सवाल केला जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदित्य यांनीही 'आरे'त वृक्षतोड होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. दरम्यान, 'आरे' प्रकरणातील शिवसेनेच्या एकंदर भूमिकेचा आगामी निवडणुकीत काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details