महाराष्ट्र

maharashtra

बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

By

Published : Oct 18, 2019, 12:12 PM IST

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती पत्रकाद्वारे प्रसिद्ध झाली आहे.

तृप्ती सावंत

मुंबई- वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

शिवसेनेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सावंत यांनी मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल 'ईडी' कार्यालयात दाखल

तृप्ती सावंत यांना मातोश्रीवरून छुपे पाठबळ मिळत असल्याची समाज माध्यमातून चर्चा होती. यामुळे शिवसैनिकांमध्ये द्विधा मनस्थिती होती. तृप्ती सावंत यांच्यासह सर्व बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी मागे घेऊन पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटले होते. मात्र, आपल्या मतावर बंडखोर ठाम असल्यामुळे शिवसेनेने तृप्ती सावंत यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली.

हेही वाचा - उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा

ABOUT THE AUTHOR

...view details