महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सत्याचा कोंबडा आरवलाय' आता तरी जागे व्हा; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा - news in mumbai

आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा मनमोहन यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. सरकारने कलम 370 हटविले याचा आनंद आहेच आणि त्याबद्दल सरकारचे कौतुक करायलाच पाहिजे. मात्र, काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे

By

Published : Sep 4, 2019, 11:24 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:50 AM IST

मुंबई - माजी पंतप्रधांन डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर केलेल्या टिकेचे शिवसेनेने समर्थन केले आहे. शिवसेनेच्या "सामना" या मुखपत्रातून शिवसेनेने मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे-सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा मनमोहन यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. सरकारने कलम 370 हटविले याचा आनंद आहेच आणि त्याबद्दल सरकारचे कौतुक करायलाच पाहिजे. मात्र, काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा -नोटंबदी व जीएसटी सारख्या चुकीच्या निर्णयांमुळे देश मंदीच्या गर्तेत सापडला - मनमोहन सिंह

देशातील आर्थिक स्थितीवर मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाष्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून बाण मारले आहेत. वाईट काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली हे मान्य करावे लागेल. मागे जेव्हा देशावर आर्थिक मंदीचे सावट आले होते तेव्हा मनमोहन सिंगांनी देशाला या संकटातून सावरले होते, असे म्हणत मनमोहन सिंग यांच्या कामाचे कौतुकही मुखपत्रातून केले आहे.

हे ही वाचा -'मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच देश मंदीच्या गर्तेत'

Last Updated : Sep 4, 2019, 11:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details