महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Shirsat On Cabinet Expansion : ​​केंद्रात शिवसेनेला दोन मंत्री पदे मिळतील; संजय शिरसाट यांचा दावा - केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या मंत्रीमंडळात एकूण 20 जणांना स्थान मिळेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रात देखील शिंदे गटाला दोन मंत्री पदे मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Shirsat
संजय शिरसाट

By

Published : May 14, 2023, 4:06 PM IST

Updated : May 14, 2023, 6:09 PM IST

संजय शिरसाट

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याबरोबरच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातही शिंदे गटाला दोन मंत्री पदे मिळणार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'20 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल' :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना शिंदे गटाच्या याचिकांवर ताशेरे ओढत 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभा अध्यक्ष या सर्व मुद्द्यांवर कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आमचे सरकार कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात सुद्धा शिंदे गटाला 2 मंत्रीपदे मिळणार आहेत, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करतील. किमान दहा दिवसात विस्ताराबाबत निर्णय होईल. एकूण 20 जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे शिरसाट म्हणाले.

'पहाटेचा शपथविधी योग्यच' : भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे विधान केल्यानंतर शिंदे गटाकडून या विधानाची पाठराखण करण्यात आली आहे. भाजपच्या दाव्याशी आम्ही सहमत आहोत. राज्यात निवडणुका झाल्यानंतर शिवसेना भाजपचे सरकार येईल यासाठी आम्ही आनंदात होतो. मात्र यात अचानक बदल झाला. शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपने ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेच्या शपथविधीची खेळी खेळली, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. कर्नाटकच्या निकालावरून शिवसेना ठाकरे गटावर त्यांनी टीका केली. दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेस ठाकरे गटाला त्यांची लायकी दाखवून देईल, असेही शिरसाट म्हणाले.

युवा खासदारांना संधी मिळणार : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाकडून युवा खासदारांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे या दोघांची नावे आघाडीवर आहेत. शेवाळे यांचे नाव पहिल्या दिवसापासून चर्चेत होते मात्र राज्यात आता सत्ता परिवर्तन झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा :

  1. Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप
  2. Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला.
  3. Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक; शरद पवारांच्या निवासस्थानी ठरणार रणनीती
Last Updated : May 14, 2023, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details