मुंबई :शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात वितृष्ट आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीत नव्या कार्यकारणी निवडली. उद्धव ठाकरे यांना यातून वगळले. पक्षप्रमुख पदी एकनाथ शिंदेंची 40 आमदारांनी एकमताने निवड केली. हे सगळ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता दर पाच वर्षांनी केल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकारणीची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काही सदस्यांची निवड करावी लागणार आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक घेण्यासाठी परवानगी (ShivSena requests election commission) घ्यावी लागणार आहे. त्यानुसार केलेल्या प्रक्रियेची माहिती खासदार अनिल देसाईंनी (Anil Desai) याबाबत पत्रकार परिषदेत दिली.
अनिल देसाईंचा शिंदे गटावर आरोप : कार्यकारणी नियुक्ती या प्रक्रियेला शिंदे गटाचा विरोध आहे. देशभरात कार्यकर्ते विखुरलेले असतात. त्यामुळे कार्यकर्ते कसे मोजणार, असा युक्तिावाद शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. शिंदे गटाला ही प्रक्रिया नको आहे. आपण उघड्यावर पडू, अशी भीती असल्याने केवळ लोकप्रतिनिधींच्या आधारावर शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा ठोकला जात असल्याचा आरोप देसाईंनी केला.