मुंबई -जेव्हा शिवसेनेची स्थापना झाले त्या वेळेला लोक म्हणत होती की शिवसेना मुंबई ठाण्याच्या पुढे जाणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. हिंदुत्त्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा आज (शनिवारी) 55वा वर्धापन दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत बाळासाहेबांच्या विचारावर मार्गक्रमण -
शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात नष्ट झाले. मात्र, शिवसेना आजही दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर पुढे जात आहे. भविष्यात आजपेक्षाही जास्त प्रखरतेने शिवसेना राष्ट्रीय राजकारणात दिसेल, असा दावाही त्यांनी केला. 'दिल्लीचेही तक्त राखतो, महाराष्ट्र माझा' याचे कडवे हे बहुतेक शिवसेनेच्या भविष्यासाठी लिहिले आहे. दिल्लीचे तख्त राखतो यांना शिवसेनेचा विचार यापुढे महत्त्वाचा राहणार आहे. दरम्यान, 'राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेस पक्षाची बांधणी ही वेगाने हो', अशा शुभेच्छाही राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या.
हेही वाचा -वर्धापनदिन विशेष; हिंदुत्व ते किमान समान कार्यक्रम, शिवसेनेची वाटचाल