अमरावती- मागील कित्येक महिन्यांपासून सातत्याने खासदार नवनीत राणा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवत आहे. आज आमदार रवी राणा यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावर जोरदार टीका केली. यावर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज जोरदार प्रत्युत्तर देत शहरातील राजकमल चौकात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या बॅनरला जोडे मारत त्यांचा विरोध केला.
अमरावतीत शिवसेना आक्रमक, राणा दाम्पत्याच्या बॅनरला मारले जोडे - shivsena oppose MP Navneet Rana
मेळघाटमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना नवनीत राणा झोपल्या आहेत. घरात बसून नवनीत राणांनी स्टंट मारने बंद करावे. हे चित्रपटाचे शूटिंग नाही, अशी जोरदार टीका शिवसैनिकांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडा मातोश्रीवर बसू नका, लोकांच्या समस्या जाणून घ्या, अशी टीका नवनीत राणा या वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करीत आहेत. मागील आठवड्यात मेळघाटमध्ये सुद्धा त्यांनी एसटीमधून व्हिडिओ तयार करून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे, आता शिवसेना आक्रमक झाली आहे. मेळघाटमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना नवनीत राणा झोपल्या आहेत. घरात बसून नवनीत राणांनी स्टंट मारने बंद करावे. हे चित्रपटाचे शूटिंग नाही, अशी जोरदार टीका शिवसैनिकांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
हेही वाचा-अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ; लॉग इन होत नसल्याच्या तक्रारी