महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमच्याकडे पर्याय उपलब्ध असून आम्ही पर्याय असल्याशिवाय बोलत नसल्याचे म्हटले.

संजय राऊत

By

Published : Nov 7, 2019, 4:03 PM IST

Updated : Nov 7, 2019, 5:00 PM IST

मुंबई -शिवसेनेकडे संख्याबळ आहे. आम्ही ते सभागृहामध्ये दाखवणार आहोत. आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय असल्याशिवाय आम्ही बोलत नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे. याद्वारे राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू

शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

जनतेने महायुतीला जनादेश दिलेला आहे. एकट्या भाजपला नाही. तसेच भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांनी आधी राज्यापालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा. त्यांनी १४५ आमदारांचे बहुमत सिद्ध करून दाखवावे. यापूर्वी देखील त्यांनी अल्प मतातले सरकार आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Nov 7, 2019, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details