मुंबई - मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रावरून काल सामना सुरु झाला. या सामन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेत मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्याला शिवसेनेच्या महिला आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले असून ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिले आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिर उघडण्याबबात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बार आणि इतर व्यवहार सुरळीत सुरु करताना मंदिर बंद ठेवणे हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे स्वागत करण्याचे आमचे हिंदुत्व नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात सुरु झालेल्या सामन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. वाह प्रशासन ! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. यावर मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असे थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत शरसंधान साधले आहे. ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली, असे राऊत म्हणाल्या.
हिंम्मत असेल तर समोर येऊन बोलून दाखवावं, शिवसेना महिला आघाडीचे अमृता फडणवीस यांना आव्हान
मंदिरे खुली करण्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्याला शिवसेनेच्या महिला आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले असून ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिले आहे.
विशाखा राऊत
ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिने त्याच्या भूमिकेत राहावे. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडले तर तोंड लपवायला जागा राहणार नाही, असे प्रत्युत्तर राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिले आहे.