मुंबई- शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत घोटाळ्यानंतर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले. राऊत यांचे सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळले. मात्र आता राऊत यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं असून त्यांनी भाजपा व किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते आज आपल्या मुंबईतील निवासस्थानी बोलत होते.
रामनवमीला झालेले हल्ले मोठं षड्यंत्र' काय म्हणाले राऊत?- त्यांनी कुणालाही पत्र लिहू द्या. ते विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. आरोपी पत्र पाठवत असतात. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवरती कधी तणावाचं वातावरण नव्हतं. कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. या राज्यातील वातावरण तनावाच करण्याच षड्यंत्र देखील रचलं होतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे.
महाराष्ट्रातील ओवैसी - काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातले ओवैसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहे. या विषयावर ती सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत. त्याच्या वरती काही कार्यवाही सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भोंग्याचं राजकारण झालं होतं. पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे.
हेही वाचा -Ramoji Rao Granddaughter Married : रामोजी रावांच्या नातीचा विवाह; देशभरातील मान्यवर उपस्थित
एकेकाळी लंकेत सोन्याच्या विटा होत्या - डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाही त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. बिगर भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत विशेष करून ममता या सर्वांना शरद पवार आणि माननीय मुख्यमंत्री यांनी एकत्र करून मुंबई या संदर्भात एक कॉन्फरन्स घेणार आहोत त्यासंदर्भात तयारी सुरू झालेली आहे. तिथे लंका आहे तिथे जा जरा अभ्यास करा आपल्या शेजारच्या राष्ट्रात काय चाललं आहे. श्रीलंकेत याआधी सोन्याच्या विटा होत्या आता त्या ठिकाणी महागाई आणि बेरोजगारी या दोन प्रश्न आहेत आणि आता या देशात देखील असेच प्रश्न आहेत त्यामुळे भाजप स्वतः यात लंकेला आग लावतील.