महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...हे भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकारावरुन भाजपला लक्ष्य केले आहे.

Shivsena Leader Sanjay Raut Reaction On Book Of Aaj Ke Shivaji Narendra Modi
खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

By

Published : Jan 12, 2020, 9:54 PM IST

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकारावरुन भाजपला लक्ष्य केले आहे. एक सुर्य...एक चंद्र आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज...असे म्हणत राऊत यांनी या प्रकरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी बोलावे असे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हा प्रकार सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मान्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करुन या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली. हे भाजपमध्ये शिरलेलया छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असेही राभत म्हणाले.


आज के शिवाजी नरेंद्र मोदी..हे पुस्तक लिहणारे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! असे ट्वीट करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details