मुंबई -महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाच्या संख्येवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच शनिवार- रविवार विकेंड लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. मात्र, अनेक नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे.
पश्चिम बंगालमध्ये महाभारत
पश्चिम बंगाल विधानसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठपलं आहे. त्यामुळे राजकीय पक्ष पुन्हा प्रचारामध्ये दंग झाले आहेत. यापूर्वी पहिल्या चारही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळाला होता. त्यामुळे आता पाचव्या टप्प्यात तरी शांततेत मतदान पार पडेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचे युद्ध सुरू आहे एक नव महाभारत असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन ममताजींनी केले आहे का? इतर मोठ्या नेत्यांच काय? असे म्हणत राऊतांनी अप्रत्यक्ष भाजपला टोला लगावला आहे.
विरोधी पक्षाला खोचक टोला
जर विरोधी सरकारला महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे असेल आणि त्यासाठी त्यांनी नवीन तारीख जाहीर केली असेल तर त्यासाठी शुभेच्छा. असा खोचक टोला राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.